गतिमंद विद्यार्थी हे इतर मुलांच्या स्पर्धेत मागे पडतात. त्यांची गती कमी असल्यामुळे त्यांना त्यांच्या कलाने शिकवावे लागते. हे ओळखून रोटरी रेडक्रॉस स्वगती शिक्षण शाळेत विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान दिले जाते. या ज्ञानाचा उपयोग करून त्यांना छोटासा व्यवसाय स्वतंत्रपणे करता यावा आणि त्यातून त्यांचे अर्थार्जन व्हावे, हा हेतू असतो. याकरिता शाळेतील मुलांना मेणबत्ती, आकाशकंदील, पणत्या, कागदी पाकिटे, राख्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. समाजऋणाची असलेली जाणीव अन् त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न करण्याचा मानस असणाऱ्या अनेक कृतीशील व्यक्ती या मुलांनी तयार केलेली उत्पादने आवर्जून खरेदी करुन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देतात. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांपेक्षा विद्यार्थ्यांना या कौशल्याची आलेली समज हीच आगामी आयुष्यासाठी त्यांची मोठी संपत्ती ठरते.
रोटरी रेडक्रॉस स्वगती शिक्षण शाळा अशीच अखंडपणे चालू राहावी, या शाळेत गतिमंद असणाऱ्या विशेष मुलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत याकरिता समाजाने भक्कमपणे शाळेच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. तुम्ही पुढील कोणत्याही मार्गाने शाळेला पर्यायाने विद्यार्थ्यांना मदत करू शकता.
i) रोटरी रेडक्रॉस स्वगती शिक्षण शाळेला देणगी देऊन .
ii) शाळेतील मुलांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करून .
iii) शाळेला वस्तू स्वरूपात मदत करून.
i) शाळेतील १८ वर्षांपुढील गतिमंद मुलांचा विविध आस्थापनातून किंवा अन्य व्यवसायात समावेश करून.
ii) रोटरी रेडक्रॉस स्वगती शिक्षण शाळेविषयी समाजात प्रसार करून .
Rakhi
Rakhi
Rakhi
Rakhi
Rakhi
Rakhi
Rakhi
Candle
Candle
Candle
Candle
Organdi Flower
Diwali Pooja Kit + Panti
Organdi Flower
Organdi Flower
Decorative Envelope
Decorative Envelope
Diwali Pooja Kit + Panti
Diwali Pooja Kit + Panti
Diwali Pooja Kit + Panti
Paper Enevolope
Paper Enevolope
Paper Enevolope
Paper Enevolope
Paper Enevolope